मोठी बातमी! रवींद्र जडेजाने सोडलं चेन्नईचं कर्णधारपद, आता…

मुंबई | आयपीएलचे सामने आता रोमांचक स्थितीत आले आहेत. आयपीएलमध्ये आता अनेक थराराक सामने पहायला मिळत आहे. मात्र, आयपीएलचा दादा संघ असलेल्या सीएसकेला यंदा चांगली कामगिरी करता आली नाही.

आयपीएलच्या मेगालिलावानंतर महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर जडेजाला सीएसकेचा नवा कर्णधार करण्यात आलं होतं. मात्र, सीएसकेला अद्याप सुर गवसलेला नाही.

आयपीएलमधील आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात चेन्नईला फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आता चेन्नईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अशातच आता चेन्नई संघाने मोठी घोषणा केली आहे.

चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा राजीनामा दिला आहे. सतत होणार्या पराभवामुळे जडेजाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या संघाची जबाबदारी पुन्हा धोनीवर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, चेन्नईला आगामी सामन्यात चांगली खेळी करण्याची गरज आहे. त्यानंतर प्लेऑफसाठी रस्ता मोकळा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

“विलासरावांच्या पत्रावर मी न वाचताच सही केली अन् शरद पवार…”

प्रशांत किशोर यांचे सुर बदलले म्हणाले, “भाजपचा पराभव करायचा असेल तर…”

‘…म्हणून मी शिवसेना सोडतोय’; शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

“बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”

“…तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार चालत राहणार”, अजित पवारांच्या वक्तव्याची एकच चर्चा