मोठी बातमी! बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं

पुणे | राज्यात घेण्यात आलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. सर्व स्तरातून या निर्णयावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

वाईन विक्रीच्या निर्णयावरुन वातावरण तापलेलं असतानाच वारकरी संप्रदायातील एक चर्चित व्यक्तीमत्त्व बंडातात्या कराडकर यांनी या वादात उडी घेतली.

बंडातात्या कराडकर यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना  सर्वच राजकीय नेत्यांची मुलं दारु पित असल्याचं सांगत पुरावे असल्याचाही दावा केला. त्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण आणखीनच चिघळलं.

वातावरण वाढत चालल्याचं पाहून बंडातात्या यांनी माफी देखील मागितली. माझ्या वक्तव्यानं भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं बंडातात्या यांनी म्हटलं आहे.

बंडातात्या यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद चिघळलेला असताना सातारा शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बंडातात्याविरुद्ध पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि मठातून बंडातात्या यांना ताब्यात घेतलं.

ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केलं. पत्रकारांनी आता विषय वाढवू नये, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

बंडातात्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आयोग चांगलंच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. बंडातात्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाकडून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी अडचणीत; ईडीनं केली ‘ही’ मोठी कारवाई

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर

  ‘जर माझं चुकलं असेल तर….’; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बंडातात्यांनी मागितली माफी

  धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण 

  दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी