पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी अडचणीत; ईडीनं केली ‘ही’ मोठी कारवाई

चंदीगड | पंजाबमधील विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत. अशातच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.

अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे पुतणे भूपिंदर हनी यांना अटक केली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी चौकशीसाठी हनी यांना बोलवलं होतं. मात्र चौकशीमध्ये समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं आज ईडीनं त्यांना अटक केलं.

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहेत. त्यामुळे याचा परिणाम आता निवडणूकांमध्ये पहायला मिळू शकतो.

जवळपास 7 ते 8 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर भूपिंदर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुले याते पडसाद

काँग्रेस 6 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावांची चर्चा आहे. यावर आता हनी यांच्या अटकेमुळे काही प्रभाव होईल का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

10 कोटींपैकी 7.9 कोटी रुपये भूपिंदरसिंग हनीच्या घरातून जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, 21 लाख रुपये किंमतीचे सोने आणि 12 लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू सापडल्या.

हनीच्या अटकेमुळे आता मुख्यमंत्री चन्नी अडचणींत सापडले आहेत. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जाऊ लागलं आहे. आम आदमी पक्षाने तर राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर

  ‘जर माझं चुकलं असेल तर….’; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बंडातात्यांनी मागितली माफी

  धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण 

  दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी

टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा