गोळीबाळानंतर ओवेसींच्या सुरक्षेत वाढ, आता देणार Z सेक्युरिटी

नवी दिल्ली | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे खळबळ पहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशात झालेल्या या घटनेमुळे सगळेच हैराण झाले आहेत. दोन लोकांनी त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचं समजतंय.

असदुद्दीन ओवेसी या गोळीबारातून थोडक्यात बचावले. गोळीबाराच्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आता केंद्र सरकारने ओवेसींच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. केंद्रानं आता त्यांना Z सेक्युरिटी दिली आहे.

ओवेसींवरील हल्लाप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ते कुणाशी संबधीत आहेत, काय करतात, कुठल्या पक्षाचं ते काम करतात याची माहिती अद्याप समोर आली नाही.

सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक काळापासून ते हल्ल्याची तयारी करत होते, असं समोर आलं आहे.

4 राऊंड फायर झाले, 3 ते 4 लोक होते, शस्त्र तिथेच टाकून हल्लेखोर पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो, मी सुरक्षित आहे, असं ट्विट ओवैसी यांनी केलं आहे.

उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला. त्यानंतर वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं

  पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी अडचणीत; ईडीनं केली ‘ही’ मोठी कारवाई

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर

  ‘जर माझं चुकलं असेल तर….’; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बंडातात्यांनी मागितली माफी

  धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण