मोठी बातमी! पुण्यात लोखंडी छत कोसळून ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

पुणे | पुण्यातून एक वाईट बातमी समोर येत आहे. पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ इमारतीची स्लॅबची जाळी कोसळली आहे. त्यामुळे आसपासच्या भागात खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.

गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे छत कोसळल्याची घटना तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

गंभीर जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरीक घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडूनही बचावकार्य सुरु करण्यात आलं.

या घटनेबाबत माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. याशिवाय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विट करत याविषयी माहिती दिली.

येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असं ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

वाडिया फार्मच्या जागेवर ब्ल्यू ग्रास कंस्ट्रकशनची इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या बेसमेंटचे काम आता सुरू असून, तेथे भूमिगत स्लॅबसाठी लोखंडी छत तयार करण्याचं काम 15 कामगार करत होते. मात्र अचानकपणे लोखंडी छत कोसळल्यानं सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण

  दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी

टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा

 शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू