नवी दिल्ली | गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसानं नागरिकांची चिंता वाढवली आहे. वातावरणातील बदलांमुळे हवामानावरही परिणाम दिसून येत आहे.
हिंदी महासागरात उष्ण लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आलं आहे. याचा मान्सून आणि सागरी जीवनावर वाईट परिणाम होणार असल्याची भीती या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनानं हैराण करुन सोडलं आहे. तर दुसरीकडे ऐन थंडीतही अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सध्या नागरिक तर वैतागल्याचं पहायला मिळत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे थंडीही चांगलीच वाढली आहे. या हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.
उत्तर प्रदेशातील अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. नोएडा ते बहराइच, श्रावस्ती, पिलीभीत, लखीमपूर खेरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरीही हैराण झाले आहेत.
खराब हवामानामुळे उत्तर प्रदेशसाठी अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं.
सध्या थंडीची तीव्र लाट असल्याचं पहायला मिळत आहे. ऐन थंडीतही अनेक भागांत पावसानं हजेरी लावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! पुण्यात लोखंडी छत कोसळून ‘इतक्या’ जणांचा मृत्यू
धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण
दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी
टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा
शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ