मोठी बातमी! रद्द झालेली म्हाडाची परीक्षा आता ‘या’ तारखेला होणार

मुंबई | म्हाडा पेपरफुटीवरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी राज्य सरकारवर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे.

आरोग्य भरती परीक्षेच्या पाठोपाठ म्हाडाचेही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला तर भाजपनेही या प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

म्हाडाची परीक्षा 12 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात येणार होती. मात्र ती अचानक रद्द करण्यात आली त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची आक्रोश पहायला मिळाला.

म्हाडातील 144 पदांच्या 565 रिक्त जागा भरण्यासाठी 12 ते 20 डिसेंबरदरम्यान परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेला अगदी काही तास राहिले असतानाच म्हाडाची परीक्षा रद्द झाली. त्यामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापल्यांचं पहायला मिळालं.

11 डिसेंबर रोजी म्हाडाची परीक्षा स्थगित करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली होती. त्यानंतर एकच खळबळ सुरु झाली.

खासगी संस्थांकडून परिक्षा घेतल्या जात असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आता सर्व परीक्षा म्हाडाच घेणार असल्याची माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.

सध्या गाजत असलेलं पेपर फुटी प्रकरण समोर आल्यावर आता म्हाडाकडून परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. रद्द झालेली ही परीक्षा 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. त्यानुसार 29, 30 आणि 31 जानेवारी तसेच 1 ते 3 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे.

दरम्यान, परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशाप्रकारचा सातत्याने काळाकारभार चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही, असं म्हणत विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले पहायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”

‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती