राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! ‘या’ शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक कारवाया, हल्ले होत असलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये  जोरदार कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे.

आरोपांचा ससेमिरा सुरु असताना राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाल्याची गंभी घटना समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात राजळे यांना गोळी लागली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अहमदनगरच्या मॅक्सकेअर रूग्णालयात राहुल राजळे यांच्यावर उपचार सुरू असून परिसरात खळबळ माजली आहे.  राजळे यांच्या पायाला गोळी लागल्याचं समोर आलं आहे.

पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याविषयी तपास केला जात आहे.  रात्रीच्या वेळी राजळे हे आपल्या गाडीनं घारकडं निघाले होते. घोडेगाव परिसरात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली म्हणून….”; भाजपचा हल्लाबोल

  “देशात सध्या एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे”

  Corona Update: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘या’ ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक

  ‘शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका, अन्यथा…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

  आत्ताची मोठी बातमी! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, तणावाचं वातावरण