मुंबई | भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार राडा सुरु आहे. राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार आहे, यावरुन शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राणा दाम्पत्यांना हनुमान चालीसाचं पठन करु देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिक घेतला आहे. यावरुन राज्यात गदारोळ पहायला मिळत आहे.
शिवसैनिकांच्या राड्यावरुन आता राणा दाम्त्यांनी ठाकरे सरकारवर आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी असल्याचं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.
आज आपण मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणारच असा निर्धार यावेळी राणा दांपत्यानं केला असून, आज आपण मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणारच असा निर्धार यावेळी राणा दांपत्यानं घेतला आहे.
शिवसैनिकांपाठोपाठ आता राणा दाम्पत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतलेला पहायला मिळत आहे. शिवसैनिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे नाहीत असा टोलाही रवी राणा यांनी लगावला आहे.
ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी आहे पाहता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला शनी लागलेला आहे, असा खोचक टोला रवी राणा यांनी लगावला आहे.
राज्यात भोंग्यावरुन आणि हनुमान चालीसा पठनावरुन राजकीय वातावरण पेटलं आहे. मुंबईत आज जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे.
मुंबईत कोणाताही राडा होऊ नये यासाठी आता खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना 149ची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
महत्त्वाच्या बातम्या –
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! ‘या’ शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार
“शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली म्हणून….”; भाजपचा हल्लाबोल
“देशात सध्या एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे”
Corona Update: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘या’ ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक
‘शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका, अन्यथा…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा