CSK च्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्क्दायक बातमी; धोनीने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | CSK च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. एमएस धोनीने (MS dohni) अखेर चेन्नई सुपर किंग्सचे (Csk captaincy) कर्णधारपद सोडलं आहे.

धोनीचा हा सीजन खेळून पुढच्या मोसमात कॅप्टनशिप सोडेल अशी चर्चा होती. पण धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडलं आहे.

धोनी आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेच्या टीमने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे.

धोनीने रवींद्र जाडेजाकडे सीएसकेची कॅप्टनशिप सोपवली आहे. जाडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सीएसकचे नेतृत्व करणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे.

धोनीने कॅप्टनशिप सोडली असली, तरी तो चेन्नईकडून खेळत रहाणार आहे. 2008 मध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हापासून धोनी चेन्नईचं नेतृत्व करतोय.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा… 

करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ! 

“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता” 

अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले… 

मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू