मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर चित्रपट सृष्टीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येऊ लागली आहे. सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर आली आहेत.
अभिनेत्री दीपिका पादुकोनचंही नाव अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आलं आहे. याप्रकरणी एनसीबीनं दीपिकाची चौकशी देखील केली आहे. अशातच आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीपिका पादुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरीच एनसीबीला ड्र.ग्ज आढळले आहेत.
माहितीनुसार, अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीनं अनेक ड्र.ग्ज पेडलर्सला ताब्यात घेतलं आहे. एका ड्र.ग्ज पेडलरनं चौकशी दरम्यान करिश्मा प्रकाशचं नाव घेतलं होतं. करिश्मा या ड्र.ग्ज पेडलरच्या सातत्यानं संपर्कात होती, अशी माहिती तपासादरम्यान उघडकीस आली होती. यामुळे एनसीबीनं याप्रकरणी शोध घेण्यासाठी तिच्या घरावर छापा टाकण्याचं ठरवलं.
यानुसार ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तिच्या घरावर छापा टाकला. एनसीबीला यावेळी तिच्या घरात ड्र.ग्ज सापडले. छापेमारी दरम्यान एनसीबीला करिश्मा प्रकाशच्या घरात 1.8 ग्रॅम चर.स आढळला. यानंतर आता एनसीबीनं करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला आहे.
ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. करिश्मा प्रकाशला समन्स बजावण्यात आला आहे. करिश्माला उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरू असल्यानं आत्ताच काही माहिती देऊ शकत नाही, असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.
तसेच करिश्मा प्रकाश सध्या गायब असल्याचंही वानखेडे यांनी सांगितलं आहे. करिश्मा प्रकाश सध्या गायब आहे. तिच्याशी संपर्क करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहोत. मात्र, तिच्याशी संपर्क होत नाही, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अं.मली पदार्थ प्रकरणी अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री सारा अली खान, नम्रता शिरोडकर रिया चक्रवर्ती यांची एनसीबीनं याप्रकरणी चौकशी केली आहे. एनसीबीनं अनेकांना ग.जाआड देखील केलं आहे.
सुशांत सिंह राजपुतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी अं.मली पदार्थ प्रकरणी पुरावे मिळल्यानं एनसीबीनं तिला अ.टक केलं होतं. 29 दिवसांच्या को.ठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं रिया चक्रवर्तीचा सशर्त जामिन मंजूर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा सरदार लवकरच करतोय लग्न! ‘ती’ आहे तरी कोण?
‘या’ बड्या अभिनेत्रीने पुन्हा उद्धव ठाकरेंवर केले धक्कादायक आरोप म्हणाली…
करीनानं शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूरचा फोटो! नक्की कनेक्शन काय आहे?
खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का? भाजप कार्यालयातील ‘त्या’ घटनेनं अनेकजन गोंधळात!
धक्कादायक! मुंबईत ‘या’ बड्या अभिनेत्रीवर चाकूने ह.ल्ला