“अनिल देशमुख मंत्रिमंडळात परत येतील, शरद पवार त्यांना…”

नागपूर | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची लवकरच मंत्रिमंडळात घरवापसी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अनिल देशमुखांच्या घरवापसीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

परमबीर सिंह भ्रष्टाचारी माणूस आहे. यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही. लवकरच अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील, असं अमोल मिटकरी म्हणालेत. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार अनिल देशमुखांना गृमंत्रिपद देतील असंही मिटकरींनी सांगितलं. मिटकरींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अनिल देशमुख यांच्या संदर्भात भाजपने कटकारस्थान केले आहे हे आता समोर आले आहे. सचिन वाझे रोज रंग बदलतोय.. परमबिर सिंह भ्रष्टाचारी माणूस आहे. त्यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही, असंही मिटकरी म्हणालेत.

लवकरच अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील आणि शरद पवार त्यांना पुन्हा गृहमंत्रिपद देतील असा विश्वास आहे, असं मिटकरी म्हणाले.

दरम्यान, अमोल मिटकरींनी यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदारकी जात असल्याने सदाभाऊंची अवस्था पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. त्यामुळेच ते शरद पवारांवर टीका करत आहेत, असं म्हणत अमोल मिटकरींनी सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार साहेबांनी काय केलं. यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे आधी शोधणं महत्त्वाचं आहे, असा हल्लाबोल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं” 

‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; सलग सहाव्यांदा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं