Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट

मुंबई | राज्यसभा निवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान झाले. राज्यातील 288 पैकी 285 आमदारांनी मतदान केले आहे. या मतदानादरम्यान महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांनी मतदान केल्यानंतर आपल्या मतपत्रिका पक्षप्रतोदाशिवाय इतर नेत्यांना दाखवल्याचा आक्षेप भाजप आणि पराग आळवणी यांच्याकडून घेण्यात आला होता.

आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे, ठाकूर यांनी नाना पटोले यांना, तर कांदे यांनी अरविंद सावंत यांना मतपत्रिका दाखवली होती. ही मते बाद करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीत झालेल्या मतांची मोजणी करण्यास परवानगी दिली नसल्याचे पुढे आले आहे.

निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपच्यावतीने काही आक्षेप घेण्यात आले हेाते. मात्र, दोन्ही बाजूचे आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळले हेाते. मात्र आता निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

महाविकास आघाडीकडूनही सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यांनी मतदान केल्यानंतर आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखवल्याचा आक्षेप काँग्रेसचे आमदार अमर राजूकर यांनी घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं आणि…” 

Rajyasabha Election | गुलाल आम्हीच उधळणार- उद्धव ठाकरे 

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; केली ‘ही’ नवी घोषणा 

“हवेत उडणाऱ्या भाजपच्या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल” 

“आजपासून भाजपच्या अध:पतनाला सुरुवात झालीये”