“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं आणि…”

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. तसेच, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना खोचक सल्ला देखील दिला आहे.

राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. मात्र कोल्हापूर येथील पोटनिवडणूक चंद्रकांत पाटील लढले नाहीत. पण तिथे भाजपाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाहीत, असा टोला रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

दिलेला शब्द चंद्रकांत पाटील यांनी पाळला पाहिजे आणि हिमालयात जायला पाहिजे, असं म्हणत रूपाली पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे आणि ध्यान करावं. यामुळे त्यांच्या मनाला आणि डोक्याला निश्चित शांती मिळेल. तसेच त्यांच्या संस्कारामध्ये देखील वाढ होईल, अशी बोचरी टीका रूपाली पाटील यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rajyasabha Election | गुलाल आम्हीच उधळणार- उद्धव ठाकरे 

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; केली ‘ही’ नवी घोषणा 

“हवेत उडणाऱ्या भाजपच्या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल” 

“आजपासून भाजपच्या अध:पतनाला सुरुवात झालीये” 

राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!