‘घटनेच्या तीन तासांनंतर…’; अखेर सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं कारण आलं समोर

चंदीगड | प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मानसा येथे सिद्धूवर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

पंजाबमधील आप सरकारने काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोपर्यंतच सिद्धू मुसे वाला याची हत्या करण्यात आली. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात सिद्धू मुसे वाला याचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले. आता या हत्येमागील कारण समोर आलं आहे.

घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे.

सर्व भावांना राम राम, सत् श्री अकाल, मूसेवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आम्ही आज घेतला आहे, असं गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बिश्नोई गँगच्या विरोधी गटाला सिद्धू मुसेवाला समर्थन करत होता. त्यामुळे सिद्धू मुसेवाला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता, अशी माहितीही समोर आलीये.

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या काडतुसांवरून हल्ल्यासाठी तीन वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असावा, असं पोलीस महासंचालक म्हणाले.

 महत्त्वाच्या बातम्या- 

“राष्ट्रवादी हा शेजारच्या घरी पाळणा हलला की पेढे वाटणारा पक्ष” 

“पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार”

मोठी बातमी | भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर 

  मोठी बातमी ! प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसे वाला यांची हत्या

  मोठी बातमी ! मान्सून केरळमध्ये दाखल, ‘इतक्या’ दिवस आधीच आगमन