“राष्ट्रवादी हा शेजारच्या घरी पाळणा हलला की पेढे वाटणारा पक्ष”

मुंबई | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

2014 मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी ही काँग्रेस-राष्ट्रवादीने आणली. ती बंदी उठवण्यासाठीचा पहिला अध्यादेश माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी आणला. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विधेयक आणलं होतं आणि बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला होता, असं सांगत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

टाळगाव चिखली येथे आमदार महेश लांडगे यांनी सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीला भेट दिली. यावेळी खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उच्च आणि सर्वोच न्यायालयामध्ये बैलगाडा शर्यती उठवण्याबाबतची बाजू खऱ्या अर्थाने आमदार महेश लांडगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी समिती नेमली होती, त्याचा रिपोर्ट ग्राह्य धरला आणि बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की, शेजारच्या घरात जरी पाळणा हलायला लागला तरी हे पेढे वाटतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

उसाला लागलं कोल्हा, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. ऊस आला की कोल्हा तेथे खायला जातो. त्यामुळे बैलगाड्यावर बंदी कुणी आणली होती, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार”

मोठी बातमी | भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर 

  मोठी बातमी ! प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसे वाला यांची हत्या

  मोठी बातमी ! मान्सून केरळमध्ये दाखल, ‘इतक्या’ दिवस आधीच आगमन

  “आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही”