सुशांतचे पोस्टमोर्टम रिपोर्ट आम्हाला दिले नाहीत…; बिहार सरकारचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील गुंता दिवसागणिक वाढतंच चालला आहे. मुंबईमध्ये या प्रकरणी तपास सुरू असतानाच सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे एफआयआर दाखल केली आहे. ही एफआयआर वैद्य असल्याचं आज सर्वोच्च न्यायलयानं सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात बिहार सरकारने यावेळी मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना अजिबात सहकार्य केलं नाही. तसेच सुशांतचे पोस्टमोर्टम रिपोर्टही दिले नाहीत, असे आरोप बिहार सरकारने केले आहेत. न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात बिहार सरकारची बाजू मांडली. सुशांतच्या मृत्यूची मुंबईत अद्यापही एफआयआर दाखल झालं नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, रिया चक्रवर्तीने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याबरोबरच अनेक गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केले आहेत. सध्या सीबीआय रियाची चौकशी करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई हादरलं! धावत्या कारमध्येच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

महाराष्ट्राने कोरोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेन- नरेंद्र मोदी

‘नारायण राणेंचे जेव्हा आम्ही पाठीराखे होतो तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते’; गुलाबरावांचं राणेपुत्रांना सणसणीत प्रत्युत्तर

भाजपचा ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर!

शेवग्याची पानं ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतात संजीवनी; वाचा सविस्तर!