नवी दिल्ली | बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचं असल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलंय.
बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायचं आहे. त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत. परंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांना आपला सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे. यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहेत, अशी माहिती मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आली.
दरम्यान, 1975 मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 2000 पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–इथून पुढे खासगी बॅंकांमध्ये शासकीय पैसा ठेवणार नाही-महाराष्ट्र शासन
“तुम्ही सेक्युलर असाल तर आंबेडकरांच्या नावाला पाठिंबा द्या”
-सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यांवरुन उर्जामंत्र्यांनी केलं ब्राह्मण समाजाला लक्ष्य!
-मोठी बातमी : लवकरच कोरोनावरील औषधाचा शोध लागणार!
-अखेर डोनाल्ड ट्रम्पही पडले नमस्काराच्या प्रेमात!