कोरोनाच्या संदर्भात अण्णा हजारेंनी पर्यटकाना केलं हे आवाहन…

अहमदनगर | कोरोना विषाणू आटोक्यात येईपर्यंत पर्यटकांनी राळेगणसिद्धीस न येण्याचं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकांना पत्रकाद्वारे केलं आहे.

नागरिकांनी न घाबरता या विषाणूला धैर्याने तोंड देण्यासाठी जी पथ्ये पाळावी लागतात ती पाळावीत जेणेकरून या  विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं आहे.

कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी हा रोग आटोक्यात येईपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येउ नये, असा निर्णय राळेगणसिद्धी परिवाराने घेतला असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत 16 लाखांपेक्षा जास्त  राज्य, देश व विदेशातील पर्यटकांनी राळेगणसिद्धीस भेट दिलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बिल गेट्सनी दिला मायक्रोसॉफ्ट संचालक मंडळाचा राजीनामा, आता करणार या क्षेत्रात काम…

-इथून पुढे खासगी बॅंकांमध्ये शासकीय पैसा ठेवणार नाही-महाराष्ट्र शासन

“तुम्ही सेक्युलर असाल तर आंबेडकरांच्या नावाला पाठिंबा द्या”

-सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यांवरुन उर्जामंत्र्यांनी केलं ब्राह्मण समाजाला लक्ष्य!

-मोठी बातमी : लवकरच कोरोनावरील औषधाचा शोध लागणार!