संतापजनक! नेताजींच्या जयंतीदिवशीच टीएमसी आणि भाजपमध्ये जोरदार राडा

कोलकाता | आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांच्या जुलमी राजवटीला भिडणारे महान नेते सुभाषचंद्र बोस यांची आज देशात जयंती साजरी केली जात आहे. अशात पश्चिम बंगालमध्ये मोठा वाद झाला आहे.

पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काॅंग्रेसमध्ये असणारा वाद सर्व देशाला माहिती आहे. निवडणुकीत असो की इतर कोणत्याही कारणानं हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभं ठाकतात.

पश्चिम बंगालमध्ये सध्या टीएमसीची एकहाती सत्ता आहे. काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत ममता यांच्या तृणमूलला पराभूत करण्यासाठी भाजपनं प्रचंड मोठी ताकत लावली होती.

भाजपनं सर्व ताकद लावूनही भाजपला पराभवला सामोरं जावं लागल्याची टीका ममता बॅनर्जींनी अनकेदा केली आहे. त्यानंतर राज्यात अनकेदा भाजप आणि तृणमूलमध्ये वाद  झाला आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या भाजप खासदार आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला आहे. या वादात दगडफेकीची घटना घडली आहे.

भाजप खासदार अर्जुन सिंह हे भाटपाडा येथील नेताजींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आले होते. पण तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानं हा वाद झाला आहे.

तृणमुल काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदारांसोबत गैरवर्तन केल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता दिसताच अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकानं हवेत गोळीबार केला आहे.

भाजप आणि तृणमूलमधील चालू असणारा संघर्ष हा पुन्हा चर्चेत आला आहे. भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीनं अडवल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, तृणमूल काॅंग्रेसकडून भाजपचे हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. भाजप खासदाराच्या सुरक्षा रक्षकानं गोळीबार करणे ही योग्य बाब नसल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 “राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती” 

”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार” 

पोलिसांसाठी महत्वाची बातमी; इतकी मोठी पगारकपात होणार 

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञ चिंतेत; दिला ‘हा’ गंभीर इशारा