महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर; भव्य सत्कार करणार

कोल्हापूर | महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना (Maharashtra Kesari 2022 final match) हा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) आणि मुंबईच्या विशाल बनकर यांच्यात पार पडला होता.

या अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरला धुळ चारत महाराष्ट्र केसरीचा मान पटकवला. 6 मिनिटांच्या या लढतीत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारत 5-4 नं मात केली.

जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. आज ते कोल्हापूरात बोलत होते.

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलचा भाजप सत्कार करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज पाटीलला पुढील सरावासाठी भाजपकडून पाच लाख देण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात प्रचार करत आहेत. त्यावेळी कोल्हापूरात विजय भाजपचाच होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘तुम्हाला बजावून सांगतोय की…’; अमित शहांवर प्रकाश राज भडकले

जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ, म्हणाले ‘शरद पवार साहेबांना….’ 

थेट युक्रेनमध्ये पोहोचले ब्रिटेनचे पंतप्रधान; झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल 

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3435 रिक्त जागांवर बंपर भरती, आजच करा अर्ज