राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलन केलं. त्यावेळी चप्पल फेक करण्यात आली. त्यावेळी मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.

या प्रकरणानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. भाजपने या प्रकरणाचा निषेध देखील केला. त्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका देखील घेतली. भाजप नेत्यांनी अनिल बोंडे यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली होती.

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. सरकार आपल्याच नेत्यांना वाचवू शकत नाहीत, ते जनतेची सुरक्षा काय करतील?, असा सवाल बोंडे यांनी विचारला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आले.

भाजप नेते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी भूमिका मांडत आहेत. त्यावर तुमचं काय मत आहे?, असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर भाजपचं असं काही ठरलं नाही. ती भाजपची अधिकृत भूमिका नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर प्रश्न विचारल्यावर फडणवीस भडकले. मी तिसऱ्याचा प्रवक्ता नाही. तुम्ही हे मला का विचारताय?, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, फडणवीसांनी यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली आहे. नानांना भगव्याचा एवढा राग का?, असंही फडणवीसांनी यावेळी विचारलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुम्हाला बजावून सांगतोय की…’; अमित शहांवर प्रकाश राज भडकले

जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ, म्हणाले ‘शरद पवार साहेबांना….’ 

थेट युक्रेनमध्ये पोहोचले ब्रिटेनचे पंतप्रधान; झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल 

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3435 रिक्त जागांवर बंपर भरती, आजच करा अर्ज 

“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”