मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, अशी गर्जनाच शरद पवार यांनी केली आहे. आता याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार यांनी भाजपची काळजी करू नये. आधी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असं आव्हान भाजपने शरद पवारांना दिलं आहे. भाजपने ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदरणीय, शरद पवार साहेब भाजपची काळजी करू नका. स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा, असं भाजपने म्हटलं आहे.
इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असं आव्हानच भाजपने ट्विटरवरून दिलं आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका ट्विटमध्ये भाजपने म्हटलंय की, आदरणीय शरद पवारजी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी राज्यातील प्रश्न सोडून दाखवा.
राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात एसटी बंद, 6 महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा, असं सांगत भाजपने पलटवार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही”
कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, चीनने घेतला आणखी एक मोठा निर्णय’
अनिल परब यांचा पाय आणखी खोलात; धक्कादायक माहिती समोर
‘इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडावर