भाजपच्या नगरसेवकांचा राडा! डोक्यात हेल्मेट घालून नगरसेवकांनी केलं ‘हे’ अजब कृत्य; पाहा व्हिडिओ

पिंपरी चिंचवड | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अनेक राज्यांतील सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर खालच्या पातळीवरील टीका करत आहेत. परंतु आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सभागृहात याच्याही पुढील प्रकार घडला आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवर भाजपची सत्ता आहे. मात्र, पिंपरी चिंचवड मधील भाजपच्याच नगरसेवकांनी सभागृहात राडा घातला आहे. नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ घालत तोडफोड केली आहे.

भाजपच्या काही नगरसेवकांनी तेथील सुरक्षा रक्षकाला देखील मारहाण केली आहे. तसेच सभागृहातील माईक, फोन इत्यादी गोष्टींची देखील नगरसेवकांनी तोडफोड केली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी केलेली तोडफोड पाहून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी डोक्यात हेल्मेट घालून सभागृहात प्रवेश केला होता.

सभापती आणि आयुक्त आपल म्हणनं ऐकत नाहीत, म्हणून आपण हा राडा घातल्याचं भाजपच्या नगरसेवकांनी म्हटलं आहे. मात्र, हा सर्व डाव पूर्वनियोजित असल्याचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणनं आहे.

या राडेबाजीवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नगरसेवकांच्या या राडेबाजीमुळे भाजपचं पितळ उघडं पडलं आहे, असं नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नुकतंच कर्नाटक विधान परिषदेत देखील असाच राडा पहायला मिळाला होता. कर्नाटक सरकारने गायींचे रक्षण करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडलं होतं. पण या विधेयकानंतर सभागृहात मोठा गदारोळ उडाला होता. कर्नाटक विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सभागृहातच धक्काबुक्की झाली होती.

या नव्या कायद्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये मतभेद होते. मात्र, हेच मतभेद थेट हानामारीपर्यंत पोहचले होते. या घटनेमुळे लोकशाहीला आणि संसदीय प्रणालीलाच काळीमा फासली गेल्याचं लोकांचं म्हणनं आहे.

सभागृहाचे काम चालू होतानाच विधान परिषदेतील काही आमदारांनी उपसभापतींना थेट खुर्चीवरून खाली खेचले. उपसभापतींनी या खुर्चीवर बसणे असंविधानिक आहे, असं या नेत्यांचं म्हणनं होतं.

सभागृहातील हा वाद चांगलाच पेटला होता. यानंतर अखेर हाऊस मधील मार्शल्सला या वादात हस्तक्षेप करावा लागला होता. यावेळी दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“भाजपमध्ये दहापेक्षा अधिक आमदार नाराज असून राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”

पंकजा मुंडे आणि रोहित पवारांनी एकत्र काम करण्यासाठी भाजपच्या सुजय विखे पाटलांची साद, म्हणाले…

विधान परिषदेत मारहाण! धक्काबुक्की करत उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचले; पहा व्हिडिओ

मोठी बातमी! ‘या’ माजी आमदाराला पुणे पोलिसांकडून अ.टक;

सारा अली खानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, वरून धवनसह रणवीर सिंगनं देखील केलं ट्रोल!