“काँग्रेसच्या काळातही चित्ररथाला परवानगी नव्हती, मग टीका आताच का?”

मुंबई | यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी मिळालेली नाही. यावरुन विरोधीपक्षाने भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. संचलनात चित्ररथास स्थान न मिळणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

गणतंत्र दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ नाही, म्हणून काही लोक लगेच टीकेच्या मार्गी लागले आहेत. विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांना वगळले म्हणून ओरड केली जात आहे. अर्थात वस्तुस्थिती त्यांना सोयीस्करपणे जाणून घ्यायची नसेल, असं म्हणत भाजपने टीका केली आहे.

दरवर्षी 32 राज्यांकडून प्रवेशिका मागविल्या जातात. त्यापैकी 16 राज्यांची निवड होते. केंद्र सरकारचे 8 मंत्रालय असे दरवर्षी केवळ 24 चित्ररथ असतात. वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधीत्त्व मिळावे, म्हणून रोटेशन पद्धतीने निवड होते, असं भाजपनं ट्विट करुन सांगितलं आहे.

महाराष्ट्राला यापूर्वी अनेकदा प्रतिनिधीत्त्व नव्हते. 1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013, 2016. ही वर्ष पाहिली तर दोन अपवाद वगळता केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. मग मा. मोदीजींनी महाराष्ट्र पं. बंगाल वगळले, अशी टीका आताच का?, असा सवाल भाजपने केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-