“घोटाळ्याच्या नादात अशी झाली दैना… पवार गुरूजींच्या शाळेत विद्यार्थीच राहिना…!”

मुंबई |  जसजश्या विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यात तशतशे आरोप प्रत्यारोपांचे वार अधिक जोरात केले जाऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधून नेत्यांची मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग सुरू आहे. यावरच भाजपने व्यंगचित्र काढत राष्ट्रवादीवर बोचरा वार केला आहे.

घोटाळ्यांच्या नादात अशी झाली दैना… पवार गुरुजींच्या शाळेत विद्यार्थीच राहीना, असं बोचरं कॅप्शन देत भाजपने राष्ट्रवादीवर शरसंधान साधलं आहे.

आज शिक्षकदिनाचं मुहूर्त साधून राष्ट्रवादीने भाजपवर टीका करणारं व्यंगचित्र ट्वीट केलं होतं. आम्ही राष्ट्रभक्त आहोत… आणि शिक्षक हा राष्ट्राचा आधार आहे, असं फडणवीस बोलत असल्याचं व्यंगचित्रात दाखवलं होतं. त्याच ट्वीटला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गेले अनेक दिवस राष्ट्रवादीतून सत्ताधारी भाजपात जाण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे. राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यांच्या याच दुखऱ्या नसेवर भाजपने बोट ठेवलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

महत्वाच्या बातम्या-