चित्रा वाघ आणि धनंजय महाडीक यांच्यावर भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!

मुंबई : नुकतेच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक आणि चित्रा वाघ यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

धनंजय महाडीक यांची नियुक्ती भाजपने कोल्हापूर प्रदेश उपाध्यक्षपदी केली आहे. तर चित्रा वाघ यांची मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या नियुक्त्या जाहीर केल्या.

धनंजय महाडीक यांनी कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीकडून खासदारकी भूषवली आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे सोमवारी सोलापुरमधील सभेत महाडीक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच त्यांना भाजपकडून प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रावादीमध्ये असताना चित्रा वाघ यांच्याकडे पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली होती. 26 जुलै रोजी चित्रा वाघ यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता.

दरम्यान, सांगलीमधून भाजपचे नगरसेवक शेखर इनामदार यांच्यावरही भाजपने प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

महत्वाच्या बातम्या-