शरद पवारांनी घेतला पुणे मेट्रोचा आढावा; चंद्रकांत पाटील म्हणतात, “हक्कभंग आणला पाहिजे”

पुणे | राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात राज्यात राजकारण जोरात आहे.

मुंबई आणि पुणे या दोन महापालिकांच्या निवडणुकीवर सध्या सर्वांचं लक्ष आहे. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई ही सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.

पुणे महापालिकेला श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल जातं. सध्या पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. पण राष्ट्रवादी आपली सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे.

पुणे महापालिकेनं आपला सर्वात महत्त्वाचा प्रकल्प पुणे मेट्रोवर सध्या अधिक लक्ष दिलं आहे. निवडणुकीच्यापुर्वी प्रत्यक्ष नागरिकांसाठी मेट्रो सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौरा केला होता. मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह पवार यांनी मेट्रोचा प्रवास केल्यानं सध्या भाजपनं जोरदार टीका केली आहे.

शरद पवारांनी पुण्याचे खासदार आणि आमदार नसताना अधिकाऱ्यांसोबत असं मेट्रोची ट्रायल घेणं हे योग्य नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्यासोबत अधिकाऱ्यांनी कोणत्याचं स्थानिक प्रतिनिधींना न कळवता हे काम केल्यानं त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहीजे, असं पाटील म्हणाले आहेत.

पुणे मेट्रोचं काम पुर्ण करण्यात सर्वात जास्त वाटा हा केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारनं आतापर्यंत या प्रकल्पासाठी तब्बल 8 हजार कोटी रूपये दिले आहेत, असं पाटील म्हणाले आहेत.

मेट्रोची ट्रायल घेताना स्थानिक प्रतिनिधी असायला हवे होते. पण मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांना कोणताच अधिकार नसताना हे काम केलं अशी टीका केली आहे.

दरम्यान, पुण्यातील नागरिकांच्या सोईसाठी ही मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. पण त्याअगोदर श्रेयवादाची लढाई जोरदार रंगणार असल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार

‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं