मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (mulgi zali ho) या मालिकेत आघाडीची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (kiran Mane) यांना अचानक मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.
याच मुद्द्यावरून सध्या खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच आता राजकीय वातावरण देखील पेटल्याचं पहायला मिळतंय.
अशातच आता हे प्रकरण अनेक वळणं घेताना दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या मुद्द्यावरून आमने सामने आल्याचं दिसत होतं. त्यावरून आता भाजने थेट किरण माने यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी किरण माने यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी टविट करत किरण माने यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
किरण माने यांचे बोलवते धनी कोण आहेत?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या किरण मानेला प्रोडक्शन हाऊसनं हाकलून दिलं आहे. मग मानेनं नवं नाट्य उभं केलं, असं वाघ म्हणाल्या.
महिलांचा विनयभंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर विखारी टिका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
किरण माने यांचे बोलवते धनी कोण आहेत. या सोगाड्यांना कारवाई करा आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी समोर; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका
‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी
“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?”
‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार