“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा जीव भांड्यात पडला”

मुंबई | एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला आहे. आज आर्यन खान जेलमधूमन बाहेर येण्याची शक्यता आहे. यावरून भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर भाजपानं राष्ट्रवादी, शिवसेनेला खोचक सवाल विचारले आहेत. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का?, असं भाजपनं विचारलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलेच गाजतंय. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB नं अटक केली. त्यानंतर देशभरात याची चर्चा सुरु झाली. यानंतर रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषद घेत मलिकांनी वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता.

बोगस जात प्रमाणपत्र, भ्रष्टाचार, निकाहनामा जारी करत वानखेडे कुटुंब बोगस असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. आता अखेर आर्यनला जामीन मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

काय सांगता! एका शहामृगाने लावली गाड्यांसोबत शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

आर्यन खानला अखेर जामीन मिळाला; उद्या तुरुंगातून बाहेर येणार?

“पुढील अनेक दशकं भाजप पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल”

‘या’ मंगळसुत्राच्या जाहिरातीवर नेटकरी संतापले; सब्यसाचीची जाहिरात चर्चेत