राज ठाकरे म्हणतात; मला सत्ता नको तर …

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पहिल्या प्रचार सभेचा काल गोरेगावमधील खार येथे नारळ फुटला. राज ठाकरेंनी आपल्या पहिल्या सभेत जनतेला मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष द्या, असं आवाहन ठाकरेंनी जनतेला केल. राज्याला एका कणखर विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. 

मी विधानसभेला एक वेगळी भूमिका घेऊन आलो आहे. विरोधीपक्षनेता रकारला नामोहरम करू शकतो. प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आज समोर आलो आहे. आता पर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने ही मागणी केली नाही ती मी आज करतोय, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदार गप्प बसतात मग तुमचे प्रश्न मांडणार कोण?, असा सवालही ठाकरे यांनी केला.

कालची पुण्याची सभा वादळी पावसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. शहरांचा पार विचका झालाय. अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची जरी अशी अवस्था होत असेल तर काय बोलायचं?, असं राज ठाकरे यामनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

दरम्यान, कालच्या सभेत राज ठाकरेंनी विरोधी पक्षावर आणि त्यासोबतच शिवसेना प्रमुखांवरही मोठ्या प्रमाणात टाका केली.  

महत्वाच्या बातम्या-