भाजपने शब्द पाळला! आता वर्षभरात तीन LPG cylinder मोफत मिळणार

पणजी | नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाबसह देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसह इतर पक्षांनी अनेक घोषणा केल्या होत्या. यामध्ये पक्षांनी मोफत वीज आणि मोफत गॅस सिलेंडर देण्याच्या घोषणा केल्या होत्या.

आता या पंजाब वगळता 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे आता भाजप शब्द पाळणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

गोव्यात भाजपने काँग्रेस आणि इतर पक्षांना दणके देत आपली पुन्हा सत्ता स्थापन केली. भाजपचे दिग्गज नेते प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता प्रमोद सावंत यांनी मोठी घोषणा केली आहे.

गोव्याच्या प्रमोद सावंत सरकारने आपली घोषणा पूर्ण करत एका वर्षात राज्याला 3 एलपीजी मोफत सिलेंडर (LPG cylinder) भेट दिले आहेत. त्यामुळे आता भाजपने दिलेला शब्द पाळला असल्याची चर्चा देशभर होत आहे.

डॉ. प्रमोद सावंत यांनी काल म्हणजेच 28 मार्च रोजी गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, गोव्यात अखेर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. त्यानंतर अखेर डॉ. प्रमोद सावत यांचं नाव निश्चित करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?”

 अनिल देशमुख मंत्रिमंडळात परत येणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं”