‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेते आक्रमक! आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंसह कॉंग्रेसवर केला घणाघात

मुंबई| सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांंना भाजप नेते आशिष शेलार यांनी खुलं आवाहान केलं आहे. आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चा करूयात. आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

कांजूर मार्गामध्ये मेट्रो कारशेड उभारण्यावरुन भाजपनं शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. कांजूर मार्गाची जागा केंद्र सरकारची असल्यामुळं केंद्राने राज्य सरकारला मेट्रोचं काम थांबवण्याचं पत्र पाठवलं आहे. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

कांजूर मार्गाच्या जागेबद्दल न्यायालयात अनेक केसेस आहेत. या गोष्टी आपण जनतेला का सांगितल्या नाही. केंद्र सरकारने 22 सप्टेंबरला या जागेबाबत न्यायालयात खटला दाखल केला होता हे का लपवण्यात आले, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

बाफना नावाच्या व्यक्तीने न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. जानेवारी 1997 मध्ये त्यावर स्थगिती आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यानंतर महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एवढी मोठी जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय का घेतला? असाही सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

कांजूर मार्गामधील मेट्रो कारशेडच्या जमिनीवर केंद्राने अचानक दावा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. या परिसरात आता केंद्र सरकारकडून ही जागा केंद्राच्या मालकीचे असल्याचे बोर्ड तत्परतेने लावण्यात आले आहेत. ही जागा मिठागाराची असून त्यावर केंद्र सरकारचा हक्क असल्याचा मजूकर या फलकांवर दिसत आहे.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कांजूर मार्गाची जागा राज्य सरकारला मिळून द्यायचीच नाही, असा विचार केंद्र सरकारने बांधलेला दिसत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखीनच तापण्याची चिन्हे आहेत.

आशिष शेलार यांनी यावेळी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. काँग्रेसने गिरणीच्या जागा अशाच विकासकांना दिल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपकडून काही चुकलं असेल तर आम्ही जनतेची माफी मागायला तयार आहोत, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी उध्दव ठाकरेजी आज काँग्रेस सोबत करतायत की काय? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूर मार्गाला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा मेट्रोला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे.

याप्रकरणी केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूर मार्गाची जागा मेट्रोला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही आमचा हक्क सोडलेला नाही, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ही’ प्रसिध्द अभिनेत्री गोव्यातील बीचवर विवस्त्र दिसली! पोलिसांनी टाकलं गजाआड

अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ! आता ‘या’ प्रकरणी अर्णव यांच्या विरोधात दुसरा गु.न्हा दाखल होणार?

सुप्रसिद्ध अभिनेत्री ते शेवटी वेश्या कोण होती ही अभिनेत्री? वाचा सविस्तर

अर्णबला अ.टक करण्यासाठी ठरला होता मोठा प्लॅन; जाणून घ्या सर्व माहिती

‘जो बायडन’ असतील अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष? पाकिस्तानला होणार ‘हा’ फायदा