सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आणखी एका व्यक्तीला एनसीबीनं रंगेहात पकडलं

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या नि.धनाला कित्येक महिने झाले आहेत. सुशांतचे वांद्रे येथील फ्लॅटमध्ये 14 जून रोजी नि.धन झाले.  सुरुवातीला मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले‌.

या प्रकरणात एकामागून एक बरीच मोठी नावे समोर आली. सुशांत प्रकरणातील खुलासे आतापर्यंत धक्कादायक आहेत. सुशांतच्या आ.त्मह.त्या प्रकरणी सुरू झालेला हा शोध आता बॉलीवूड मधील ड्र.ग्जच्या विषययावर येवून पोहोचला आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सध्या तपास करत आहे.

अं.मली पदार्थांच्या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 30 लोकांना अ.टक करण्यात आली आहे. अशातच आता अं.मली पदार्थ प्रकरणी एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले गेल्याची माहीती समोर आली आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी 30 वर्षीय आरोपी अब्दुल वाहिद याचं नाव पुढे आलं होतं. यानंतर एनसीबीनं अब्दूलचा शोध घेत तपास सुरु केला.

एनसीबीने अब्दुल वाहिदला बुधवारी मुंबईच्या अंधेरी परिसरातील आझाद नगर मेट्रो स्टेशन येथून अ.टक केली आहे. त्याच्याकडून 650 ग्रॅम भां.ग, काही मे.फेड्रॉ.न, च.रस, 1.75 लाख रुपये आणि एक कार एनसीबीने जप्त केली आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अब्दुल वाहिदला अ.टक करणे हे एक मोठे यश आहे, असं एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर एनसीबीला असा विश्वास आहे की, अब्दुल वाहिदच्या अ.टकेनंतर अं.मली पदार्थ प्रकरणी आणखी मोठी नावे  समोर येवू शकतात.

दरम्यान,  सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी करत असताना सीबीआयला बॉलीवूड मधील ड्र.ग्ज प्रकरणाचा सुगावा लागला. यानंतर ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी तपास सुरु केला. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकत एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं.

तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या विरोधात पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं त्याला देखील अ.टक केलं होतं. तब्बल 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया चक्रवर्तीची सुटका झाली आहे.

रिया चक्रवर्तीच्या अ.टकेनंतर अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड मधील अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावे देखील अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेते आक्रमक! आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंसह कॉंग्रेसवर केला घणाघात

‘ही’ प्रसिध्द अभिनेत्री गोव्यातील बीचवर विवस्त्र दिसली! पोलिसांनी टाकलं गजाआड

अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ! आता ‘या’ प्रकरणी अर्णव यांच्या विरोधात दुसरा गु.न्हा दाखल होणार?

सुप्रसिद्ध अभिनेत्री ते शेवटी वेश्या कोण होती ही अभिनेत्री? वाचा सविस्तर

अर्णबला अ.टक करण्यासाठी ठरला होता मोठा प्लॅन; जाणून घ्या सर्व माहिती