महाकाय कोविड सेंटरसाठी लवासा ताब्यात घ्या- गिरीष बापट

पुणे | सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुण्यात रूग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे दवाखान्यातील बेड्स आता कमी पडू लागले आहेत. शाळा-महाविद्यालयाचे हॉस्टेल रूग्णांसाठी वापरलीत मात्र तीही आता कमी पडू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार गिरीष बापट यांनी एक सल्ला दिला आहे. यासंदर्भात बापट यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.

लवासामधील जागा सध्या रिक्त आहे आणि कोरोनाविरोधातील लढ्यात या जागेचा वापर करता येई शकतो. शहरातील रुग्णालये, हॉटेल आणि अन्य मालमत्ता आपण ताब्यात घ्याव्यात अशी मी विनंती करत आहे. रुग्णांसाठी बेड्स आणि कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो, असं बापट यांनी पत्रात नमूद केलं आहे.

लवासामध्ये अनेक इमारतींसोबतच सुविधांनी परिपूर्ण असं एक रुग्णालयदेखील आहे. फारच कमी लोकं त्या ठिकाणी राहत आहे. कोरोनाबाधितांना क्वारंटाइन करण्यासाठी ती जागा चांगली ठरू शकते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसंच ज्या प्रमाणे त्या ठिकाणी रुग्णालय उपलब्ध आहे त्यामुळे पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. मुळशीतील कोरोनाबाधित रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले जाऊ शकतात, असंही बापट यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, लवासा हे ठिकाण फार दूर असून काही अडचणीदेखील आहेत. विविध बाबींचा विचार केल्यानंतरच अशा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरज पडल्यास आम्ही याबाबत निर्णय देऊ, असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाग्रस्त मातेने आपल्या बाळाला जन्म दिल्यावर घेतला अखेरचा श्वास; बाळाचा अहवाल आला…

ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून पुण्याकडे रवाना!

संतापजनक! कोरोना चाचणीच्या नावे तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब!

धक्कादायक! कोरोनामुळे मृत्यु झाल्याने थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच केले सपासप वार

दिलासादायक! 10 ऑगस्ट पर्यंत कोरोनाची लस येणार?