मुंबई | मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे. माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. मी त्याचं एक टक्काही ते श्रेय घेणार नाही, असं भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
जे काही शिवसेनेसाठी केलं ते मी कर्तव्य म्हणूनच केलं. ठाकरे या आडनावावर माझी अपार श्रद्धा आहे. त्यामुळे ठाकरे आडनावाचे आत्ता जे कुणीही आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात छोटासाही आकस नाही, असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
नारायण राणेंना घडवण्याचं श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं आहे. मी शिवसेनेत असताना माझं कर्तव्य पूर्ण केलं. कोणीही जर टीका केली तर त्या टीकेला मी नक्कीच उत्तर देतो. पण कोणाविषयीही मनात कटुता नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसैनिकांना नावाने ओळखत त्यापैकी मी एक होतो. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्टचा अध्यक्ष या वेगवेगळ्या पदांवर उत्कर्ष होत गेल्याने मी बाळासाहेबांच्या जवळ गेलो. त्यावेळी बाळासाहेब मला अनेक कामं सांगत होते, असंही नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नोकरभरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या- रोहित पवार
-‘…तर आर्मी बोलवावी लागेल’; किशोरी पेडणेकरांचा इशारा
-हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा
-“देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं”