“20 जूनला देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार करणार”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यसभा निवडणुकिच्या निकालानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे राज्यसभेत भाजपचा तिसरा उमेदवार देखील विजयी झाला. त्यामुळे आता विधान परिषदेतही फडणवीसांची अशीच रणनीती यशस्वी ठरणार का?, अशा चर्चा सध्या रंगत आहेत.

राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही देवेंद्र फडणवीस चमत्कार दाखवणार, असा दावा भाजपचे नेते परिणय फुके यांनी केला आहे. फुके यांच्या दाव्यामुळे सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे.

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपचा चमत्कार दिसेल, असा दावा फुके यांनी केला. तर भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही परिणय फुके यांनी दाखवला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र त्यावेळी चमत्कार घडल्याचं फुके म्हणाले.

20 जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीत आणखी एक चमत्कार पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार दाखवतील, असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं आहे.

दरम्यान, अनेक आमदार भाजपच्या वतीनं मतदान करतील, असं सूचक वक्तव्य देखील फुके यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“पंकजा मुंडेंनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तर राजकीय भूकंप येईल”

मोठी बातमी! केतकी चितळेचा जामीन मंजूर मात्र मुक्काम अद्यापही तुरूंगातच

“संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणूनच महाविकास आघाडी स्थापन झाली”

इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंसमोर स्वतंत्र पक्षाचा प्रस्ताव, म्हणाले…

मोठी बातमी! नवाब मलिकांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता