मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षांतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. त्यात पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी वाढली आहे.
पंकजा मुंडे यांना पक्षाकडून जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थकांकडून करण्यात येत आहे. ओबीसी समाजाचा जनाधार असूनही पंकजा मुंडेंना डावललं जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पक्षाकडून सातत्याने डावललं जात असल्याने पंकजा मुंडे स्वतंत्र पक्ष स्थापन करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यातच एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंसमोर मांडलेल्या प्रस्तावाने चर्चांना उधाण आलं आहे.
पक्षाकडून वारंवार हेटाळणी सहन करण्यापेक्षा पंकजा मुंडेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, असा प्रस्ताव जलील यांनी मांडला आहे. तर गरज पडल्यास एमआयएम पक्ष पंकजा मुंडेंच्या पाठीशी राहील, असं आश्वासन देखील जलील यांनी दिलं.
पंकजा मुंडे यांनी खरंच स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर राजकीय भुकंप येईल, असं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे.
आगामी विधान परिषद आणि महापालिका निवडणुका पाहता पंकजा मुंडेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना मराठवाड्यापासूनही दूर ठेवलं जात आहे का?, अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! केतकी चितळेचा जामीन मंजूर मात्र मुक्काम अद्यापही तुरूंगातच
“संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणूनच महाविकास आघाडी स्थापन झाली”
इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंसमोर स्वतंत्र पक्षाचा प्रस्ताव, म्हणाले…