मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण बिघडलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. त्यामुळे आघाडी सरकारकडून तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला जात आहे.
केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवाईंमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. कारवाईचा सपाटा सुरु असताना आता भाजपचे सदार सुजय विखे यांनी आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
महाविकास आघाडीचा संसार हा राष्ट्रवादी-शिवसेनेच्या लग्नाप्रमाणे आहे. यामध्ये राष्ट्रवादी ही नवऱ्याच्या भूमिकेत आहे. तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे, असं सुजय विखेंनी तिखट शब्दांत म्हटलं.
काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत अशी जहरी टीका विखेंनी केली आहे.
सुजय विखे पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांना अटक करताना राज्य सरकारने कोणताही विचार केला नाही. आम्ही केवळ दोन मंत्री उचलले तर तुमची एवढी तळतळ होतीये.
अहमदनगरमध्ये बोलताना सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तपास यंत्रणांवरुन वारंवार होणाऱ्या टीकेली त्यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”
“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा”
‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा
“मेहबुबा मुफ्ती भाजपच्या मैत्रीण होत्या, मुफ्तींना भाजपनेच बळ दिलं”
यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; आयकर विभागाला सापडलेल्या डायरीने खळबळ