“काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”

मुंबई | माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, मात्र मी जे म्हणतोय ते खरं ठरतंय. काहीजण सुपात आहेत. काहीजणजात्यात आहेत. तर काही जणांचं पीठ झालं आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राऊतांना लगावला आहे.

सामना वाचणं आणि सं राऊतांवर बोलणं मी बंद केलं आहे. कालचक्र फिरत असतं. कधी आम्ही वर होतो आज कुणीवर आहे , उद्या आम्हीही वर असू, असं सूचक वक्तव्य देखील चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हे घाबरल नाही असे नेते सांगतात, मात्र हे घाबरले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बॅगा भरून ठेवल्यात. किरीट सोमय्या आगे बढो हम तुन्हारे साथ है, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी जो इशारा दिला आहे, त्यावरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं आहे. दादांना मी चिठ्ठी दिली एसटी कर्मचाऱ्यांसंबंधी असंही चंद्रकांत पटालांनी सांगितलं आहे.

केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात खूप काहीतरी होणार असल्याचं मला दिसतयं, असे सांगत, अशी डायरीत मिळत असेल तर चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा” 

‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा 

“मेहबुबा मुफ्ती भाजपच्या मैत्रीण होत्या, मुफ्तींना भाजपनेच बळ दिलं” 

यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; आयकर विभागाला सापडलेल्या डायरीने खळबळ 

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला मोठा झटका; न्यायालयानं सुनावली ‘इतक्या’ वर्षाची शिक्षा