“दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात”

मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. त्यामुळे सध्या राजकीय गदारोळ पहायला मिळत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या सलग होणाऱ्या कारवाईमुळे राज्य सरकारमधील मंत्री त्रासले आहेत. खास करुन आघाडी सरकारमधील मंत्र्यावर होणाऱ्या कारवाईमुळे.

अशातच घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती.

राजू शेट्टी यांनी आज बारामतीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर टोला लगावला.

दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात, असा टोला राजू शेट्टींनी लगावला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

अजित पवार यांचा आज बारामती दौरा सुरू आहे. विविध विकास कार्यक्रमाचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते होत आहे.

अजित दादांच्या उपस्थितीत राजू शेट्टीनं मुख्यमंत्र्यांना टोला लगावत अजित दादांचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत” 

  “काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय” 

“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा” 

‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा 

“मेहबुबा मुफ्ती भाजपच्या मैत्रीण होत्या, मुफ्तींना भाजपनेच बळ दिलं”