‘माझा नवरा अंघोळ करत नाही’; घटस्फोटासाठी पत्नीची न्यायालयात धाव

पाटणा | बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये घटस्फोटाचं एक आगळंवेगळं प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने पतीच्या घाणेरड्या सवयींना कंटाळून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. माझा पती अंघोळ करत नाही, दातही घासत नाही अशी तक्रार या महिलेने केली आहे. या महिलेने पाटण्यामधील बिहार महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन पतीविरोधात तक्रार केली आहे.

माझा पती रोज दात घासत नसल्याने त्यांच्या तोंडातून घाण वास येतो, तसेच रोज अंघोळ करण्याऐवजी तो दहा दिवसांनी एकदा अंघोळ करतो, या सर्वाला मी कंटाळले आहे, असं महिलेने म्हटलं आहे.

सोनी देवी नावाची ही महिला वैशाली जिल्ह्यातील देसरी येथील नया गाव येथे राहणारी आहे. सोनीचे लग्न 2017 साली मनीष रामशी झालं. मला पतीच्या या घाणेरड्या सवयींचा आणि राहणीमानाचा कंटाळा आला असून मला घटस्फोट हवा आहे, असा अर्ज सोनीने  केला आहे.

दरम्यान, अनेकदा चांगल्या भाषेत समजवूनही मनीषच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही अशी सोनीची तक्रार आहे. त्यामुळेच तिने थेट घटस्फोटाचा अर्ज केला आहे.

महत्वाच्या बातम्या-