मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणामुळे राणे पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ

मुंबई | देशात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे. परिणामी राज्यात भाजप कार्यकर्ते मोठा आनंद व्यक्त करत आहेत.

मुंबईत भाजप आनंद व्यक्त करत असतानाच एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राज्यासह देशात गाजलेल्या दिशा सालियन प्रकरणाला काही दिवसांपूर्वी नारायण राणेंच्या वक्तव्यांनी पुन्हा उजाळा मिळाला होता.

दिशा सालियननं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली होती. हत्येवेळी दिशा गर्भवती होती, असे धक्कादायक खुलासे राणेंनी केले होते.

नितेश राणेंनी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन प्रकरावरून जोरदार टीका केली होती. परिणामी राज्य महिला आयोग आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दिशा सालियनच्या आई-वडिलांनी देखील राणेंवर आरोप केले होते. माझ्या मुलीच्या नावाचा वापर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी करत आहात, असं सालियान दाम्पत्य म्हणाले होते.

आमच्यावर दाखल करण्यात आलेला एफआरआय रद्द करावा अशी मागणी राणे पिता-पुत्रांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. परिणामी उच्च न्यायालयाच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राणे कुटुंबियांमध्ये जोरदार राजकीय सत्तासंघर्ष रंगलेला पाहायला मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

  ‘महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकतं’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

  Health | उन्हाळात अशी घ्या स्वतःची काळजी, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम