भाजपचे आमदार फुटणार???, नाना पटोलेंचे सुचक संकेत

मुंबई | राज्यात भाजप (BJP) विरूद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) असा कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे. भाजपकडून महाविकास आघाडीचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे तर महाविकास आघाडीकडून भाजपचे आमदार संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी महाविकास आघाडीचे आमदार वाढणार असल्याचं एक वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी आमच्याकडे 174 आमदार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेत तर आणखी काही आमदार वाढणार आहेत, असे संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपचे काही आमदार फुटणार का? अशा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची देखील माहिती  आहे. विधानपरिषदेत पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी काही मुद्यांवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांना जे काही घटनात्मक जे अधिकार होते त्या अधिकारात त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं होतं.

आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पत्र न आल्याने आम्ही प्रक्रियेला सुरूवात केली आहे. आज राज्यपालांनी सकाळी ही प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचं पत्र पाठवलं होतं. आज सकाळी राज्यपालांचे पत्र आल्याने त्याचा सन्मान केला आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

तसेच राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या भीतीमुळे निवडणूक रद्द केली का ? यावर नाना पटोले यांनी राष्ट्रपती राजवट आणि अशा मुद्यांना आमचं सरकार घाबरत नाही, असं म्हटलं आहे.

राष्ट्रपती राजवट या आयुधाचा वापर केंद्रामध्ये बसलेल सरकार दुरूपयोग करत असेल तर ते घातक आहे. भाजपचे आमदार विधानसभेत म्हणतात की आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू. त्यांना लोकशाहीची चाडच नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

आम्ही दिल्लीतील सरकार नाही. आम्ही लोकशाही मानतो लोकांची मत जाणून घेतो. ते ठोकरशाही आणि हुकुमशाही करणार सरकार आहे. पहाटेची सरकार पडल्यानंतर राज्यात कुठली परिस्थिती ओढवली होती की राष्ट्रपती राजवट लावावी लागली?, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी कालीचरण महाराजांंनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. विषारी विचार राज्यात विरोधक पेरत आहेत. सोशल मीडियावर आता गांधीदुत असतील.

हिंदू लोक गांधींचा सन्मान करतात. मात्र, हिंदूत्ववादी लोक गांधीजींचा अपमान करतात. त्यामुळे राज्यभरात 10000 गांधीदुत बनवणार आहोत, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव

नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे

“म्याव म्याव करणारे लपून बसलेत, गुन्हेगार लोक नेहमीच…”

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण