“राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजप खासदार आक्रमक

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात तीन सभा घेत आक्रमक हिंदूत्वाच्या मार्गानं जाणार असल्याचं दाखवलंय. त्यानंतर राज्यात बराच गोंधळ झाला आहे.

राज्य सरकार आणि मनसे-भाजपमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे. राज ठाकरेंनी राज्यातील सभानंतर आता अयोध्या दौरा जाहीर केला आहे. त्यावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंनी कायमच मुंबईत राहाणाऱ्या उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांच्या त्याच भूमिकेवरून उत्तर प्रदेशच्या नेत्यांनी त्यांना विरोध करायला सुरूवात केली आहे.

राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असं वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं आहे.

शरण यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं आता राज्यातील भाजप नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण बहुतांश भाजप नेते राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन देत आहेत.

जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही ब्रिजभूषण यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

राम मंदीर आंदोलनापासून ते मंदीर उभारणीपर्यंत ठाकरे कुटुंबाचा मंदीराशी काहीही संबंध नाही, असं वक्तव्य देखील सिंह यांनी केलं आहे. परिणामी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावेळी योगी सरकारकडून विशेष सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत होती. पण आता भाजप खासदाराच्या आक्रमक भूमिकेमुळं योगी सरकार काय निर्णय घेतं ते पाहाणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “काय अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या”; अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

 मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनीही विकली

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर 

“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”