“राज ठाकरेंनी सभा घेण्यापूर्वी आमच्यासोबत इफ्तार पार्टी करावी”

औरंगाबाद | सध्या राज्याच्या राजकारणात हिंदूत्वाचा मुद्दा पेटत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्वलंत हिंदूत्वाची शाल पांघरल्यानंतर आता आगामी काळात हिंदूत्वाच्या मुद्दायावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

अशातच आता एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या सभा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याचं जलील यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती होऊ नये असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी सभेच्या आधी आमच्या सोबत इफ्तारसाठी यावं, असंही जलील यावेळी म्हणाले आहे.

त्यांनी इफ्तारला यावं आणि हिंदु- मुस्लिम ऐक्य दाखवावं असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे जलील यांचं आमंत्रण स्विकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांचं देखील या सभेकडे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“राष्ट्रवादीला युतीत शिवसेना नको होती, पण…”; रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

“देवेंद्र फडणवीस वर्षभरात राज्याचे मुख्यमंत्री होतील”, चंद्रकांत पाटलांचा दावा

 पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला