उदयनराजे भोसलेंना भाजपचाच विरोध?; भाजप नेत्याच्या वक्तव्याने साताऱ्यात खळबळ

मुंबई | नगरपंचायत निवडणुकांच्या निमीत्ताने सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. मंगळवारी फलटण तालुका भाजप (BJP) संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी भाजप नेत्याच्या वक्तव्याने सातऱ्यात खळबळ माजलीये.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुढच्यावेळी सातऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करुन दाखवली.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते.

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,अनुप शहा आदी उपस्थित होते.

साताऱ्याचे आत्ताचे खासदार राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील असले तरी त्यांच्या विरोधात उदयनराजे भोसले यांनी भाजपतून निवडणूक लढवली होती. उदयनराजेंचा या ठिकाणी मोठा पराभव झाला होता.

उदयनराजे भोसले हे आत्ता भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत, असं असताना पावसकरांनी केलेल्या या वक्तव्याला वेगळं महत्व प्राप्त झालय. भाजपत सगळंअलबेल चाललंय असं काही नसल्याचं दिसतंय.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे आता भाजपलाच नकोसे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनीच फलटणमध्ये केलेल्या अशा प्रकाच्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिकच जोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यांच्या राजकारणात मोठा दबदबा कायम आहे. लोकांशी थेट संपर्क ठेवण्याची त्यांची अनोखी पद्धत आणि कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा त्यांच्याकडे आहे. मात्र विक्रम पावसकर यांच्या केलेल्या वक्तव्याने साताऱ्यात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली” 

बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळण्याआधीचा पहिला व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ 

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं? 

“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”