“भाजपला सत्तेतील 50 टक्के वाटा देऊन पुन्हा ‘महायुतीचं सरकार’ स्थापन करा”

मुंबई | आपल्या आक्रमक भाषणांनी महाराष्ट्राच्या ह्रद्याला हात घालणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. आज राज्यभरातून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आर्पण करण्यात येत आहे.

साठच्या दशकात मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात बाळासाहेब नावाचं वादळ देशानं उभ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.

बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये भाजपला साथ दिली. तत्कालिन भाजचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि देशाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत बाळासाहेबांनी राज्यात भाजपला जमीन सुपिक करून दिली.

आपली पुर्ण हयात बाळासाहेबांनी काॅंग्रेस विचारांनी विरोध करण्यात घालवली असं असलं तरी बाळासाहेबांनी इंदिरा गांधीना आणीबाणी प्रसंगी साथ दिली होती.

बाळासाहेबांच्या नंतर मात्र भाजप आणि शिवसेनेची युती संपुष्टात आली. आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा युतीचा विचार मांडला आहे.

आठवले यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली अर्पण केली. शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल, असं आठवले म्हणाले आहेत.

आठवले यांनी शिवसेना आणि भाजपच्या एकीचा नवा फाॅर्मुला सुद्धा सांगितला आहे. शिवसेना आणि भाजपनं एकत्र  येण्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे, असं आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोघांनाही याबाबत विचार करण्याची विनंती केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. परिणामी उद्धव यांच्या यांचं वचनसाठी 25 वर्षांची जुनी मैत्री तोडण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांना सर्व स्तरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. सतत धावणाऱ्या मुंबईला एका आवाजावर बंद पाडण्याची शेवटची ताकद म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना ओळखण्यात येतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 पाकड्यांनी झेंडा फडकवला आणि वादाला तोंड फुटलं; वाचा नेमकं प्रकरण काय

संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इंधन दरवाढीचा परिणाम आता रिक्षावरही; केली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

  ‘पार्ट टाईम मुख्यमंत्री’; भाजपच्या या टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

  शरद पवारांचा नवाब मलिक यांना पाठिंबा, म्हणाले…