“परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो”

मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. अशातच आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

पाच राज्यातील निवडणुकीतील भाजपच्या अभुतपूर्व विजयानंतर महाराष्ट्रात भाजपनं ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

पाचपैकी तीन राज्यांमध्ये शिवसेनेनं आपले उमेदवार उभे केले होते. शिवसेना उमदेवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे अनेक नेते मैदानात उतरले होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश आणि गोव्यात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह प्रचार केला होता.

तीनही राज्यात शिवसेनेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाची आठवण काढत विखे पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

गोव्यात तुम्हाला नोटापेक्षा कमी मत मिळाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असं विखे पाटील म्हणाले आहेत.

बोलघेवड्या माणसांना पुढं करून शिवसेनेची अधोगती होईल. भविष्यात कुणीच शिवसेनेला गांभिर्यानं घेणार नाही, असा टोलाही विखेंनी लगावला आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी फक्त महाराष्ट्राला लुटण्याचा धंदा करत आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रूपये गुंतवून मिळवा तब्बल 14 लाख

मार्केटमध्ये बंपर सेल सुरु, ‘या’ गाड्यांच्या किंमती झाल्या फारच कमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! होळीपूर्वी सरकारने दिलं ‘हे’ खास गिफ्ट

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन

फोटोसाठी पोज देत होती महिला, सेकंदात जे काही झालं ते…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ