राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले “संजय राऊतांनी….”

मुंबई | दोन दिवसांपूर्वी मनसेचा (MNS) वर्धापनदिन सोहळा पार पडला. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि मनसेच्या मागील वाटचालीवर भाष्य देखील केलं.

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी टीका देखील केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची नक्कल करत टीका केली होती.

राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. नक्कल मोठ्या माणसांचीच करतात. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची प्रॅक्टिस करावी, असं राज ठाकरे उत्तर देताना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेकांत्या भूवया उंचावल्या आहेत.

राज्यात ईडीने अनेक नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आता संजय राऊत ईडीच्या निशाण्यावर आहेत का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो”

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रूपये गुंतवून मिळवा तब्बल 14 लाख

मार्केटमध्ये बंपर सेल सुरु, ‘या’ गाड्यांच्या किंमती झाल्या फारच कमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! होळीपूर्वी सरकारने दिलं ‘हे’ खास गिफ्ट

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन